Manish Jadhav
मेकअप करण्यापूर्वी त्वचा चांगल्या प्रकारे मॉइश्चराइज करा. त्वचा हायड्रेटेड असेल तरच कोरियन महिलांसारखा नॅचरल आणि चमकदार (Dewy) ग्लो मिळतो.
जाड फाउंडेशनऐवजी हलक्या स्वरुपाचे BB किंवा CC क्रीम वापरा. यामुळे चेहऱ्याचा रंग एकसारखा दिसतो आणि मेकअप थिक किंवा आर्टिफिशिअल वाटत नाही.
पूर्ण चेहऱ्यावर थरावर थर देण्याऐवजी फक्त डोळ्यांखालील काळे डाग किंवा चेहऱ्यावरील छोटे डाग लपवण्यासाठीच कंसीलरचा हलका स्पर्श करा.
कोरियन स्टाइलनुसार आयब्रोज जास्त डार्क किंवा टोकदार न करता नैसर्गिक आकारालाच हलक्या ब्राऊन किंवा ग्रे पेन्सिलने फिल करा.
डोळ्यांसाठी डार्क आयशॅडोऐवजी न्यूड, लाईट पिंक किंवा पीच शेड वापरा आणि पापण्यांना फक्त हलका मस्करा लावून नॅचरल लूक द्या.
गालांना ताजेतवाने दाखवण्यासाठी गाल आणि नाकाच्या शेंड्यावर पीच किंवा नॅचरल पिंक शेडचे ब्लश बोटांच्या साह्याने व्यवस्थित ब्लेंड करा.
ओठांवर डार्क लिपस्टिकऐवजी मध्यभागी लाईट टिंट किंवा लिप बाम लावून बाहेरच्या बाजूला ब्लेंड करा. यामुळे ओठांना नैसर्गिक आणि आकर्षक लूक मिळतो.