Manish Jadhav
हिवाळ्यात चेहरा स्वच्छ करताना त्वचा कोरडी पडू नये म्हणून नेहमी सौम्य (Gentle) क्लिंझर किंवा फेसवॉशचा वापर करा, जेणेकरुन त्वचेतील ओलावा टिकून राहील.
कोरियन लूकसाठी चेहरा ओलसर असणे गरजेचे आहे. त्यासाठी चेहऱ्यावर चांगले हायड्रेटिंग टोनर किंवा फेशियल मिस्ट हलक्या हाताने थडकवून लावा.
त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी हॅलुरोनिक एसिडयुक्त सीरम लावा. त्यानंतर त्वचेच्या प्रकारानुसार हलके क्रीम वा जेल बेस्ड मॉइश्चरायझर आवर्जून वापरा.
हिवाळ्यातही उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे चेहऱ्यावर पांढरा थर न जमणारे, ड्युई फिनिश देणारे सनस्क्रीन नक्की लावा, जे चेहऱ्याला नैसर्गिक चमक देईल.
ऑफिस-कॉलेजच्या रोजच्या घाईत जड फाऊंडेशन टाळा. त्याऐवजी हलके सीसी क्रीम (CC Cream) किंवा कुशन फाऊंडेशन बोटांच्या मदतीने चेहऱ्यावर व्यवस्थित पसरवून घ्या.
कोरियन लूकची शान म्हणजे ओठांवरचा नॅचरल रंग! ओठांना गुलाबी आणि फ्रेश लूक देण्यासाठी गडद लिपस्टिकऐवजी हलकासा लिप टिंट किंवा लिप बाम वापरा.
मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी आणि चेहऱ्यावर चकाकी कायम ठेवण्यासाठी हायड्रेटिंग मेकअप सेटिंग स्प्रे मारुन आपला हिवाळी 'नो-मेकअप लूक' पूर्ण करा!