Manish Jadhav
जसे सँडविचमध्ये ब्रेडच्या दोन थरांमध्ये मधला भाग असतो, तसेच या पद्धतीत मॉइश्चरायझरच्या दोन थरांमध्ये सीरम किंवा टोनर लावले जाते. यामुळे त्वचेतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो.
त्वचेला आतून पुरेसा ओलावा मिळाल्यास चेहरा कोरडा किंवा निस्तेज दिसत नाही. परिणामी नैसर्गिक उजाळा येतो आणि मेकअप न करताही त्वचा ताजीतवानी दिसते.
चेहरा धुतल्यानंतर लगेच थोडासा पातळ मॉइश्चरायझर किंवा फेस मिस्ट लावा. यामुळे त्वचेला लगेच थंडावा आणि ओलाव्याचा पहिला थर मिळतो.
पहिल्या थरानंतर हायलुरॉनिक अॅसिड किंवा ग्लिसरीन असलेले सीरम हलक्या हाताने लावा. हे त्वचेत खोलवर जाऊन पाणी टिकवून ठेवण्याचे काम करते.
सीरम शोषले गेल्यावर त्यावर पुन्हा मॉइश्चरायझरचा एक थर लावा. हा थर आधीचा सर्व ओलावा त्वचेत ‘लॉक’ करतो आणि बाहेर उडून जाण्यापासून रोखतो.
ज्यांची त्वचा कोरडी, निर्जीव किंवा हिवाळ्यात लगेच ताणलेली जाणवते, त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी मात्र हलके आणि जेल-बेस्ड उत्पादने निवडावीत.
एक थर लावल्यानंतर लगेच दुसरा लावण्याऐवजी 30 ते 60 सेकंद थांबा. उत्पादने त्वचेत नीट मुरल्यास चेहरा चिकट न वाटता अधिक फ्रेश दिसतो.