Manish Jadhav
ऑयली स्किनसाठी जास्त तेलकट नसलेले 'जेल-बेस्ड' किंवा 'फोम क्लीन्झर' वापरा. यामुळे चेहऱ्यावरील जास्तीचे तेल आणि घाण निघून जाते. त्वचा कोरडी पडत नाही.
कोरियन स्किन केअरमध्ये टोनर अत्यंत महत्त्वाचा आहे. ऑयली त्वचेसाठी अल्कोहोल-फ्री आणि वॉटर-बेस्ड टोनर वापरा, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.
ऑयली स्किनसाठी 'नायसिनॅमाइड' किंवा 'ग्रीन टी' युक्त सिरम सर्वोत्तम मानले जाते. हे सिरम चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल नियंत्रित करुन नैसर्गिक ग्लो आणते.
ग्लास स्किन मिळवण्यासाठी मॉइश्चरायझर सोडणे चुकीचे आहे. ऑयली स्किनसाठी 'जेल-बेस्ड' किंवा 'ऑइल-फ्री' मॉइश्चरायझर वापरा, जे त्वचेमध्ये लगेच शोषले जाते.
सूर्याच्या किरणांपासून संरक्षणासाठी दररोज सनस्क्रीन लावा. ऑयली त्वचेसाठी 'जेल' किंवा 'मॅट फिनिश' असणारे सनस्क्रीन निवडा, ज्यामुळे चेहरा चिकट दिसत नाही.
आठवड्यातून 1-2 वेळा BHA (Salycylic Acid) युक्त एक्सफोलिएटर वापरा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन (Dead Skin) निघून जाते आणि पिंपल्सचा त्रास कमी होतो.
आठवड्यातून एकदा 'कॅओलीन क्ले' किंवा 'चारकोल मास्क' लावा. हा मास्क चेहऱ्यातील अतिरिक्त तेल शोषून घेतो आणि त्वचेला स्वच्छ व चमकदार (Glass-like) बनवतो.