Korean Glass Skin Formula: कोरियन ग्लास स्किनचे सीक्रेट आले समोर! फक्त 10 मिनिटांचा '4-2-4' फॉर्म्युला देईल नैसर्गिक ग्लो, पिंपल्सचीही सुट्टी

Sameer Amunekar

 ‘4-2-4’ फॉर्म्युला नेमका काय?

कोरियन स्किनकेअरमधील लोकप्रिय 4-2-4 पद्धत म्हणजे चेहरा स्वच्छ करण्याची ठराविक पद्धत. यामध्ये क्लींजिंगला विशेष महत्त्व दिलं जातं.

Korean Glass Skin Formula | Dainik Gomantak

पहिले 4 मिनिटं – ऑइल क्लींजिंग

पहिल्या टप्प्यात सुमारे 4 मिनिटं ऑइल-बेस्ड क्लींजरने चेहरा हलक्या हाताने मसाज करून स्वच्छ केला जातो. मेकअप, सनस्क्रीन आणि अतिरिक्त तेल काढण्यास यामुळे मदत होऊ शकते.

Korean Glass Skin Formula | Dainik Gomantak

पुढची 2 मिनिटं – फेसवॉश

यानंतर 2 मिनिटं सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. त्वचेवर जोरात घासण्याऐवजी हलक्या हाताने क्लींजिंग करणं महत्त्वाचं आहे.

Korean Glass Skin Formula | Dainik Gomantak

शेवटची 4 मिनिटं – पाण्याने धुणं

शेवटी चेहरा पाण्याने नीट धुवा. त्वचा कोरडी वाटत असल्यास खूप गरम पाणी टाळा आणि चेहरा टॉवेलने घासण्याऐवजी हलक्या हाताने पुसा.

Korean Glass Skin Formula | Dainik Gomantak

मिळू शकतो नैसर्गिक ग्लो

नियमित आणि योग्य क्लींजिंगमुळे चेहऱ्यावरील धूळ, अतिरिक्त तेल आणि अशुद्धता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि फ्रेश दिसू शकते.

Korean Glass Skin Formula | Dainik Gomantak

पिंपल्सवरही होऊ शकतो फायदा

त्वचेवर अतिरिक्त तेल आणि मेकअप साचू न दिल्यास पोअर्स ब्लॉक होण्याचा धोका कमी होऊ शकतो. मात्र पिंपल्सची समस्या असल्यास केवळ 4-2-4 पद्धतीवर अवलंबून राहू नका.

Korean Glass Skin Formula | Dainik Gomantak

प्रत्येक त्वचेसाठी 4-2-4 योग्य असेलच असं नाही!

ऑयली, ड्राय किंवा संवेदनशील त्वचा यानुसार क्लींजर निवडणं महत्त्वाचं आहे. जास्त वेळ चेहरा धुतल्याने उलट कोरडेपणा किंवा irritation होऊ शकते. त्यामुळे आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार ही पद्धत वापरा.

Korean Glass Skin Formula | Dainik Gomantak

सणासुदीच्या दिवसांत हवाय इन्स्टंट पार्लर ग्लो? 'या' पद्धतीनं लावा मसूर डाळीचा पॅक

येथे क्लिक करा