Korean Glass Skin Routine: पार्लरचा खर्च कायमचा वाचवा! चेहऱ्यावर काचेसारखी चमक आणणारे 7 सीक्रेट्स; जाणून घ्या

Manish Jadhav

डबल क्लीन्झिंग

सुरुवातीला क्लीन्सिंग ऑईलने चेहऱ्यावरील मेकअप आणि धूळ-माती साफ करा, त्यानंतर नेहमीच्या फेसवॉशने चेहरा धुवा. यामुळे त्वचा आतून पूर्णपणे स्वच्छ होते.

skin care

हायड्रेटिंग टोनर

चेहरा धुतल्यानंतर टोनर कॉटनने घासण्याऐवजी हातावर घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवावा (Pat करा). यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो.

skin care | Dainik Gomantak

एसेन्स किंवा सिरम

सिरमचे 2-3 थेंब चेहऱ्यावर लावा. सिरम त्वचेच्या आतल्या थरापर्यंत पोहोचून काळे डाग कमी करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते.

skin care | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर

त्वचा मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर रोज लावा. यामुळे त्वचेतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो.

skin care | Dainik Gomantak

सनस्क्रीन

घराबाहेर पडताना किंवा घरात असतानाही सनस्क्रीन लावणे विसरु नका. सनस्क्रीनमुळे त्वचेवर टॅनिंग, काळे डाग आणि सुरकुत्या पडत नाहीत.

skin care | Dainik Gomantak

सौम्य स्क्रबर

आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा हलक्या हाताने चेहरा स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा (Dead Skin) निघून जाते आणि पोर्स बंद होत नाहीत.

skin care | Dainik Gomantak

भरपूर पाणी अन् शीट मास्क

आठवड्यातून एकदा हायड्रेटिंग शीट मास्क वापरा आणि दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. शरीर आतून हायड्रेट असेल तर त्वचा आपोआप चमकू लागते.

skin care | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा