Sameer Amunekar
कोरियन स्किनकेअरची ही पहिली पायरी आहे. आधी ऑईल-बेस्ड क्लिंजरने मेकअप काढा आणि नंतर फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे रोमछिद्रे खोलवर स्वच्छ होतात.
चेहरा धुतल्यानंतर त्वचेचे pH लेव्हल राखण्यासाठी अल्कोहोलमुक्त टोनर वापरा. टोनरमुळे त्वचा मऊ होते आणि पुढील उत्पादने शोषून घेण्यास तयार होते.
तांदळाचे पाणी हे कोरियन सौंदर्याचे गुपित आहे. कापसाच्या मदतीने तांदळाचे पाणी चेहऱ्याला लावा, यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहरा आरशासारखा चमकतो.
त्वचेला आतून पोषण देण्यासाठी हायलुरोनिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन सी युक्त सीरम लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊन त्वचा उजळते.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि थकवा घालवण्यासाठी आय क्रीमने हलका मसाज करा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि चेहरा फ्रेश दिसतो.
रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीमने चेहऱ्याचा मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
कोणतेही रूटीन तेव्हाच काम करते जेव्हा तुम्ही ७-८ तास शांत झोप घेता. तसेच, दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार राहते.