Korean Glass Skin Mistakes: आरशासारखी चमकणारी आणि तुकतुकीत त्वचा हवीय? कोरियन ब्युटी सीक्रेट्स फॉलो करताना टाळा 'या' 7 चूका

Manish Jadhav

कोरियन ग्लास स्किन हवीय?

कोरियन ब्युटी सिक्रेट्स फॉलो करताना आपण नकळत काही चुका करतो, ज्या त्वचेसाठी घातक ठरु शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

योग्य क्लिनिंग न करणे

फक्त एकदा चेहरा धुणे पुरेसे नाही. कोरियन स्किनकेअरमध्ये 'डबल क्लिन्सिझम'ला खूप महत्त्व आहे. चेहऱ्यावरील धूळ, प्रदूषण आणि मेकअप काढण्यासाठी प्रथम ऑइल-बेस्ड आणि नंतर फोम-बेस्ड क्लेंजरचा वापर करा.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

सनस्क्रीन न लावणे

तुम्ही घराबाहेर जा किंवा घरच्या घरी राहा, सनस्क्रीन लावणे कधीही टाळू नका. यूव्ही किरणे त्वचेचे नुकसान करतात आणि एजिंग वाढवतात. कोरियन स्किनकेअरमध्ये सनस्क्रीनला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

अतिप्रमाणात स्क्रबिंग करणे

चेहऱ्यावरील मृत त्वचा काढण्यासाठी जास्त जोरात किंवा वारंवार स्क्रबिंग करु नका. यामुळे त्वचेची नैसर्गिक आर्द्रता नष्ट होते आणि त्वचा लाल पडू शकते. आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदा हलक्या हाताने एक्सफोलिएट करा.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

त्वचेला पुरेसे हायड्रेशन न देणे

त्वचा कोरडी पडू देणे ग्लास स्किनच्या विरुद्ध आहे. भरपूर पाणी पिण्यासोबतच चांगल्या दर्जाचे हायड्रेटिंग टोनर, इसेन्स आणि मॉइश्चरायझरचा वापर करा, जेणेकरुन त्वचा आतून ओलसर आणि तुकतुकीत राहील.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

वारंवार चेहऱ्याला हात लावणे

हातावरील जंतू वारंवार चेहऱ्यावर गेल्याने मुरुम आणि डाग पडतात. तसेच चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा मुरुम बोटांनी फोडण्याची सवय ताबडतोब बदला, यामुळे त्वचेवर कायमचे डाग राहू शकतात.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

वारंवार प्रॉडक्ट बदलणे

सोशल मीडियावर नवीन प्रॉडक्ट पाहताच ते लगेच आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये समाविष्ट करु नका. त्वचेला कोणत्याही नवीन प्रॉडक्टशी जुळवून घेण्यासाठी किमान 3 ते 4 आठवड्यांचा वेळ लागतो.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा