Korean Beauty Tips: कोरियन मुलींसारखी 'ग्लास स्किन' हवीय! आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, चेहरा गुलाबासारखा फुलेल

Sameer Amunekar

ग्रीन टी

कोरियन लोक ग्रीन टीचे शौकीन असतात. यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतात आणि त्वचेचा लालसरपणा कमी करण्यास मदत करतात.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

फिश

मासे (उदा. रावस किंवा सरंगा) ओमेगा-३ फॅटी ॲसिडने समृद्ध असतात. हे त्वचेला नैसर्गिक ओलावा पुरवतात आणि कोरडेपणा दूर करून चेहरा मऊ ठेवतात.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

इडली, डोसा

आंबवलेले पदार्थ पोटाचे आरोग्य सुधारतात. पोट साफ असेल तर त्याचा थेट परिणाम चेहऱ्यावर होतो आणि मुरुमांची समस्या कमी होते.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

बदााम आणि अक्रोड

यामध्ये व्हिटॅमिन 'ई' मोठ्या प्रमाणात असते. हे त्वचेच्या पेशींचे सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून संरक्षण करते आणि त्वचेला तरुण ठेवते.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

फळ, भाज्या

गाजर आणि टोमॅटोमध्ये 'बीटा-कॅरोटीन' आणि 'लायकोपीन' असते. हे घटक त्वचेला नैसर्गिक सनस्क्रीनसारखे संरक्षण देतात आणि चेहरा गुलाबी दिसण्यास मदत करतात.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

हायड्रेटिंग फळे

पाणी भरपूर पिण्यासोबतच टरबूज, काकडी यांसारख्या फळांचा समावेश करा. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असेल तरच त्वचा 'ग्लास'सारखी चमकते.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

बेरीज

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी किंवा जांभूळ यामध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर असते. हे कोलॅजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचा घट्ट आणि चमकदार राहते.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

स्वराज्याचा 'तिजोरी' गड! सुरतेच्या अफाट खजिन्याचा रक्षक

Lohagad Fort Surat Loot Treasure | Dainik Gomantak
येथे क्लिक करा