Manish Jadhav
कोरियन ब्युटी सिक्रेट्समध्ये पाण्याला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. त्वचा नेहमी टवटवीत आणि मॉइश्चराइज ठेवण्यासाठी दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून त्वचेला नॅचरल ग्लो देण्यास मदत करते.
ग्रीन टी केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे, तर त्वचेसाठीही वरदान मानली जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेच्या पेशींना तरुण ठेवतात आणि सूर्याच्या किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून रक्षण करतात.
कोरियन डाएटमध्ये किमची (Kimchi) सारख्या फर्मेंटेड पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. हे पदार्थ आतड्यांचे आरोग्य (Gut Health) सुधारतात. पचनक्रिया उत्तम असेल, तर त्याचा थेट सकारात्मक परिणाम चेहऱ्याच्या त्वचेवर दिसून येतो आणि मुरुमांची समस्या दूर होते.
आहारात संत्री, मोसंबी, बेरी आणि सफरचंद यांसारख्या व्हिटॅमिन-सी युक्त फळांचा समावेश करा. व्हिटॅमिन-सी कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचा चमकदार बनते.
त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी आणि तिला आतून पोषण देण्यासाठी अक्रोड, जवस आणि माशांचे सेवन फायदेशीर ठर्ते. यामुळे त्वचेचा ओलावा कायम राहतो आणि ती मऊ व गुळगुळीत दिसते.
आहारात काकडी, पालेभाज्या आणि सूप्सचा अधिकाधिक समावेश करा. या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते.
ग्लास स्किन हवी असेल तर जास्त साखर, प्रक्रिया केलेले अन्न आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळा. जास्त साखरेच्या सेवनामुळे त्वचेवरील लवचिकता कमी होते आणि लवकर सुरकुत्या पडू शकतात.