Korean Skin Care: कोरियन महिलांसारखी चमकदार त्वचा हवीये? 'हे' 7 स्किनकेअर सिक्रेट्स नक्की ट्राय करा; मिळेल इन्स्टंट ग्लो

Manish Jadhav

डबल क्लिन्सिंग

चेहरा धुताना आधी ऑइल-बेस्ड क्लीन्सरने चेहऱ्यावरील मेकअप आणि सनस्क्रीन काढून टाका. त्यानंतर वॉटर-बेस्ड क्लीन्सरने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सर्व घाण आणि पोअर्स (छिद्रे) खोलवर स्वच्छ होतात.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

7-स्किन पद्धत

टोनरचे 1 ते 2 थेंब हातावर घेऊन ते चेहऱ्यावर हलक्या हाताने 5 ते 7 वेळा टॅप करा. या पद्धतीमुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो आणि त्वचेला आतून नैसर्गिक चमक मिळते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

तांदळाचे पाणी आणि एक्सफोलिएशन

आठवड्यातून 1-2 वेळा सौम्य एक्सफोलिएटर किंवा तांदळाच्या पाण्याने (Rice Water) चेहरा स्वच्छ करा. मृत त्वचा निघून जाऊन चेहऱ्याचा रंग उजळतो आणि पोअर्स बारीक होतात.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

शीट मास्कचा वापर

आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार शीट मास्क लावा. शीट मास्कमुळे त्वचेला आवश्यक न्यूट्रिएंट्स मिळतात आणि कोरडेपणा पूर्णपणे निघून जातो.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

सनस्क्रीनचा नियमित वापर

घरात असो वा बाहेर, दररोज कमीत कमी SPF 30+ असलेले सनस्क्रीन नक्की लावा. सूर्याच्या यूव्ही (UV) किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते आणि टॅनिंग किंवा पिगमेंटेशन टाळता येते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

फेस मसाज आणि गुआ शा

मॉइश्चरायझर लावताना चेहऱ्यावर खालून वरच्या दिशेने बोटांनी किंवा गुआ शा (Gua Sha) टूलने मसाज करा. चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते, सूज कमी होते आणि जॉ-लाईन शार्प होते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

पुरेशी झोप आणि भरपूर पाणी

रोज 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या आणि दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्या. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचा नैसर्गिकरीत्या ग्लो करु लागते.

Almond Facial for Glowing Skin | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा