Manish Jadhav
हिवाळ्यात हवा कोरडी असल्याने नेहमी फोम किंवा जेंटल ऑइल-बेस्ड क्लिंजर वापरा. यामुळे चेहऱ्याची स्वच्छता तर होतेच, पण त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.
थंडीच्या दिवसांत फक्त एकदा मॉइश्चरायझर लावणे पुरेसे नसते. आधी हलके इमल्शन किंवा सिरम लावा आणि त्यावर मॉइश्चरायझिंग क्रीम लावा. यामुळे त्वचा दीर्घकाळ हायड्रेट राहते.
टोनरचे 7 हलके थर चेहऱ्यावर लावण्याच्या या पद्धतीमुळे हिवाळ्यात त्वचा अजिबात कोरडी पडत नाही. कोरफड किंवा ग्रीन टी युक्त टोनर वापरल्यास चेहऱ्यावर काचेसारखी चमक कायम राहते.
हिवाळ्यात रात्री झोपताना कोरियन स्लीपिंग मास्क किंवा व्हिटॅमिन ई-युक्त नाईट क्रीम वापरा. रात्रभर हे मास्क त्वचेच्या खोलवर जाऊन पोषण देते आणि सकाळी चेहरा टवटवीत दिसतो.
थंडीत गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि चेहरा कोरडा पडतो. त्याऐवजी नेहमी कोमट किंवा साध्या पाण्याचाच वापर करा.
हिवाळ्यातील कोवळ्या उन्हातील अतिनील किरणे त्वचेचे जास्त नुकसान करतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी किंवा घरात असतानाही SPF 30 किंवा 50 असलेले सनस्क्रीन नक्की लावा.
हिवाळ्यात तहान कमी लागते, पण पाणी पिणे कमी केल्यास त्वचा लगेचच निस्तेज दिसू लागते. दिवसभरात भरपूर पाणी, नारळ पाणी आणि हर्बल टी प्या, जेणेकरुन त्वचा आतून चमकेल.