Manish Jadhav
काचेसारख्या मऊ आणि नितळ ओठांसाठी आठवड्यातून 1 ते 2 वेळा लिप स्क्रब करणे गरजेचे आहे. साखर आणि मध एकत्र करुन ओठांवर हलक्या हाताने मसाज केल्याने मृत त्वचा निघून जाते आणि नैसर्गिक गुलाबीपणा येतो.
कोरियन मुली रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर हायड्रेटिंग लिप मास्क किंवा लिप बाम लावतात. यामुळे रात्रभर ओठांना पोषण मिळते आणि सकाळी ओठ अगदी मऊ व प्लम्प दिसतात.
शरीर डिहायड्रेट झाल्यावर सर्वात आधी ओठ सुकतात आणि काळे पडू लागतात. त्यामुळे दिवसभरात पुरेसे पाणी प्या. शरीरात ओलावा राहिला की ओठांची त्वचा आपोआप मऊ आणि चमकदार दिसते.
ओठ वाळल्यावर वारंवार जिभेने ओठ ओले करण्याची सवय अनेकांना असते. यामुळे ओठ अधिक कोरडे आणि काळे पडतात. ही सवय पूर्णपणे टाळा आणि त्याऐवजी नेहमी सोबत चांगला लिप बाम ठेवा.
सूर्याच्या अतिनील किरणांमुळे ओठांचा नैसर्गिक रंग काळवंडतो. त्यामुळे घराबाहेर पडताना नेहमी SPF 15 किंवा त्याहून अधिक सूर्यसंरक्षण असलेला लिप बाम वापरणे कोरियन लिप केअरचा महत्त्वाचा भाग आहे.
केमिकलयुक्त लिपस्टिक वापरण्यापेक्षा कोरियन ब्युटीमध्ये लिप ऑईल्सला प्राधान्य दिले जाते. बदाम तेल किंवा नारळाच्या तेलाचे 2 थेंब ओठांवर लावल्याने ओठांना काचेसारखी नैसर्गिक चमक मिळते.
जड आणि मॅट लिपस्टिकऐवजी हलके पाण्याचे किंवा जेल-बेस्ड 'लिप टिंट्स' वापरा. हे ओठांना हलका गुलाबी रंग देतात आणि वरुन पारदर्शक लिप ग्लॉस लावल्यास कोरियन 'ग्लास लिप्स' लुक सहज मिळतो.