Manish Jadhav
केवळ महागड्या क्रिम्स किंवा सीरम लावल्याने त्वचा चांगली होत नाही. शरीराला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी न पिणे ही सर्वात मोठी चूक आहे. कोरियन स्किनसाठी पाणी आणि ज्यूस पिणे अत्यंत गरजेचे असते.
चेहऱ्यावरील चमक वाढवण्याच्या नादात अनेक जण चेहरा दिवसातून अनेक वेळा किंवा अतिशय जोरात घासून धुतात. यामुळे त्वचेचे नॅचरल ऑईल नष्ट होते आणि त्वचा कोरडी व निस्तेज पडू शकते.
घराबाहेर पडताना किंवा अगदी घरात असतानाही सनस्क्रीन न लावणे ही खूप मोठी चूक आहे. सूर्यप्रकाशातील युव्ही किरणांमुळे त्वचा काळी पडते आणि कोरियन ग्लास स्किनचे स्वप्न अपूर्णच राहू शकते.
त्वचेवर साचलेली मृत त्वचा वेळोवेळी साफ न केल्यामुळे चेहऱ्यावर मुरुम आणि डाग पडतात. योग्य स्क्रब किंवा नॅचरल उपायांनी त्वचा वेळोवेळी एक्सफोलिएट करणे गरजेचे असते.
दिवसभर चेहऱ्यावर लावलेला मेकअप तसेच ठेवून रात्री झोपणे त्वचेसाठी अत्यंत घातक ठरते. यामुळे चेहऱ्याचे पोर्स बंद होतात आणि पिंपल्सची समस्या वाढू शकते. झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे नेहमीच फायदेशीर ठरते.
सोशल मीडिया पाहून एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे स्किन केअर प्रॉडक्ट्स चेहऱ्यावर वापरणे टाळावे. यामुळे त्वचा संवेदनशील होऊ शकते आणि चेहऱ्यावर रॅशेस किंवा पुटकुळ्या उठू शकतात.
फक्त स्किन केअर करून चालत नाही, तर पुरेशी झोप घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. रात्री उशिरापर्यंत जाग्याने डोळ्यांखाली काळे सर्कल्स येतात आणि चेहऱ्यावरचा नैसर्गिक ग्लो नाहीसा होतो.