Sameer Amunekar
दिवसभराची धूळ, मेकअप आणि अतिरिक्त तेल काढण्यासाठी प्रथम ऑइल-बेस्ड क्लेन्सर आणि नंतर फेसवॉश वापरा. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते.
आठवड्यातून 1-2 वेळा सौम्य स्क्रब किंवा केमिकल एक्सफोलिएटर वापरा. यामुळे मृत त्वचा निघून जाऊन चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
चेहऱ्याला पुरेसा ओलावा देण्यासाठी हायड्रेटिंग टोनर आणि एसेन्स वापरा. ही पायरी ग्लास स्किनसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी आणि चमक वाढवण्यासाठी व्हिटॅमिन C सिरम, तर त्वचेला खोलवर हायड्रेट ठेवण्यासाठी हायलुरॉनिक अॅसिड सिरम वापरा.
त्वचा तेलकट असली तरी हलका, नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा मऊ, नितळ आणि चमकदार राहते.
घराबाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावा. सूर्याच्या किरणांपासून संरक्षण मिळाल्यास त्वचेची चमक टिकून राहते.
दररोज पुरेसं पाणी प्या, 7-8 तास झोप घ्या आणि फळे, भाज्या व प्रथिनयुक्त आहार घ्या. निरोगी त्वचेचा खरा ग्लो आतूनच येतो.