Manish Jadhav
दिवाळीत दारासमोर मोठी पण सुंदर रांगोळी काढायची असेल, तर कागदावर किंवा जमिनीवर थोडे ठिपके देऊन छानदार कमळ किंवा गुलाबाचे फूल काढा. ही डिझाईन काढायला अगदी सोपी असते आणि अवघ्या 10 मिनिटांत तयार होते.
रांगोळीचे रंग वापरण्याऐवजी झेंडूची पिवळी-केशरी फुले आणि आंब्याची पाने वापरुन दारासमोर गोल किंवा चौकोनी रांगोळी सजावट करा. ही दिसायला खूप आकर्षक दिसते आणि घराजवळ पर्यावरणपूरक वातावरण तयार करते.
दिवाळीचा सण दिव्यांशिवाय अपूर्ण आहे! म्हणूनच दाराच्या बरोबर मध्यभागी एक मोठी पणती काढा आणि तिच्या आजूबाजूला लहान डिझाईन किंवा ठिपके काढा. ही रांगोळी दिवाळीच्या सणाला अगदी परफेक्ट आणि पारंपरिक लुक देते.
ज्यांना रांगोळी काढताना आकार काढता येत नाही, त्यांनी हातातील साध्या बांगडीचा वापर करुन जमिनीवर लहान-मोठी गोलाकार वर्तुळे काढा. त्या गोल वर्तुळांमध्ये आवडीचे रंग भरले की एक सुंदर आणि वेगळीच डिझाईन तयार होते.
दिवाळीच्या कामांमुळे वेळ कमी असेल, तर बाजारात मिळणारे प्लास्टिकचे रांगोळीचे छापे आणा. जमिनीवर साचा ठेवून त्यावर रंग टाकला की, कोणतीही कटकट न करता झटपट सुरेख रांगोळी तयार होते.
कमळाचे फूल हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर लाल आणि गुलाबी रंगांचे वापर करुन सोप्या पद्धतीने कमळाचे फूल काढा. ही रांगोळी पाहुण्यांचे लगेचच लक्ष वेधून घेईल.
कोणतीही साधी रांगोळी काढून झाल्यावर तिच्या कडेने किंवा बॉर्डरवर छोट्या मातीच्या पणत्या ठेवा. संध्याकाळी जेव्हा तुम्ही या पणत्या पेटवाल, तेव्हा तुमची साधी रांगोळी देखील अतिशय चकाकणारी आणि सुंदर दिसेल.