Korean Glass Skin At Home: महागड्या ट्रीटमेंटला मारा गोळी! घरच्या घरी मिळवा कोरियन महिलांसारखी फ्लॉलेस स्किन

Manish Jadhav

राईस वॉटर मॅजिक

तांदूळ भिजवलेले पाणी फेकून न देता ते स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे नैसर्गिक 'राईस वॉटर टोनर' चेहऱ्यावर स्प्रे केल्याने ओपन पोर्स बारीक होतात आणि त्वचेवर काचेसारखी चमक येते.

Glass Skin | Dainik Gomantak

डबल क्लिन्सिंगचा कोरियन फंडा

फक्त फेसवॉशने धुण्याऐवजी आधी ऑलिव्ह किंवा नारळाच्या तेलाने चेहरा 2 मिनिटे मसाज करा आणि मग सौम्य फेसवॉश वापरा. यामुळे मेकअप, धूळ आणि जास्तीचे तेल मुळापासून साफ होते.

Glass Skin | Dainik Gomantak

7-स्किन हायड्रेशन टेक्निक

कोरियन महिला टोनर किंवा रोझ वॉटर चेहऱ्यावर एकदाच न लावता, हलक्या हाताने टॅप करत 3 ते 7 वेळा लावतात. यामुळे त्वचेच्या आतपर्यंत ओलावा पोहोचतो आणि चेहरा दिवसभर ताजा दिसतो.

Glass Skin | Dainik Gomantak

DIY राईस अन् हनी मास्क

उकडलेले तांदूळ बारीक वाटून त्यात 1 चमचा मध आणि थोडे दूध मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटे लावल्यास डाग कमी होतात आणि त्वचेला मखमली मऊपणा मिळतो.

Glass Skin | Dainik Gomantak

ग्रीन टी आईस थेरपी

ग्रीन टी बनवून ती आईस ट्रेमध्ये गोठवा. रोज सकाळी या बर्फाच्या क्यूबने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे चेहऱ्याची सूज कमी होते आणि रक्ताभिसरण सुधारुन नॅचरल ग्लो येतो.

Glass Skin | Dainik Gomantak

होममेड एलोवेरा शीट मास्क

महागड्या शीट मास्कऐवजी कॉटन पॅड्स ताज्या कोरफडीच्या रसात आणि गुलाबाच्या पाण्यात भिजवून 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. यामुळे त्वचेला तात्काळ थंडावा आणि हायड्रेशन मिळते.

Glass Skin | Dainik Gomantak

फेशिअल मसाज आणि सनस्क्रीन

रोज रात्री चेहऱ्यावर बोटांच्या टोकांनी वरच्या दिशेने मसाज करा, ज्यामुळे सुरकुत्या पडत नाहीत. तसेच, उन्हात जाण्यापूर्वी आणि घरात असतानाही सनस्क्रीन लावायला अजिबात विसरु नका!

Glass Skin | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा