Manish Jadhav
थंडीच्या दिवसांत कोरड्या हवेमुळे त्वचा लवकर शुष्क पडते. फेशियल मिस्ट चेहऱ्यावर स्प्रे केल्याने त्वचेला लगेचच ओलावा मिळतो आणि त्वचा आतून हायड्रेट होते.
दिवसभरात जेव्हा जेव्हा चेहरा निस्तेज किंवा थकलेला वाटेल, तेव्हा मिस्ट स्प्रे केल्याने चेहऱ्यावर तात्काळ ताजेतवानेपणा येतो.
थंडीमुळे किंवा कोरड्या वाऱ्यामुळे अनेकदा त्वचा लाल होते किंवा तिची जळजळ होते. कोरियन फेशियल मिस्टमध्ये असलेले ग्रीन टी आणि कोरफडीचे घटक त्वचेला शांत ठेवण्यास मदत करतात.
कोरियन ब्युटी रुटीनमध्ये 'ग्लास स्किन'साठी फेशियल मिस्ट खूप महत्त्वाचे मानले जाते. यामुळे चेहऱ्यावर अजिबात तेलकटपणा न येता एक छान नैसर्गिक चमक दिसते.
मेकअप करण्याआधी आणि नंतर फेशियल मिस्ट वापरल्यास मेकअप चेहऱ्यावर छान बसतो. हिवाळ्यात मेकअपमुळे चेहरा कोरडा किंवा पॅची (Patchy) दिसत नाही.
दमट किंवा ओलसर त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा सिरम लावल्यास ते त्वचेमध्ये अधिक वेगाने आणि आतपर्यंत शोषले जाते. त्यामुळे मिस्ट वापरल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे अधिक फायदेशीर ठरते.
फेशियल मिस्टची बाटली लहान आणि सोयीस्कर असते, ज्यामुळे तुम्ही ती बॅगमध्ये ठेवून प्रवास करताना, ऑफिसमध्ये किंवा घरात कधीही सहज स्प्रे करु शकता.