Korean Double Cleansing Method: "पार्लरच्या महागड्या क्लीन-अपला द्या कायमची सुट्टी!", घरातच करा कोरीयन स्टाइल 'डबल क्लिन्झिंग'; नक्की ट्राय करा

Manish Jadhav

'डबल क्लिन्झिंग'

डबल क्लिन्झिंग म्हणजे चेहरा एकापाठोपाठ दोन वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिन्झर्सने धुणे. यात आधी ऑइल-बेस्ड आणि नंतर वॉटर-बेस्ड क्लिन्झरचा वापर केला जातो, ज्यामुळे त्वचा आतून पूर्णपणे स्वच्छ होते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

ऑइल-बेस्ड क्लिन्झरने तेल

पहिल्या टप्प्यात क्लिन्झिंग ऑइल किंवा ब्युटी बाम चेहऱ्यावर लावून हलका मसाज केला जातो. यामुळे चेहऱ्यावरील वॉटरप्रूफ मेकअप, सनस्क्रीन, अतिरिक्त सीबम आणि दिवसभराची घाण सहजरीष्ट्या विरघळते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

चेहरा डीप क्लीन

दुसऱ्या टप्प्यात माईल्ड जेंटल फेस वॉश किंवा फोम क्लिन्झर वापरले जाते. हे क्लिन्झर त्वचेच्या छिद्रांमधील उरलेली घाण, घाम आणि धुळीचे कण पूर्णपणे बाहेर काढून चेहरा डीप क्लीन करते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सवर मात

साध्या फेस वॉशने सनस्क्रीन आणि मेकअपचे कण चेहऱ्यावरच राहतात, ज्यामुळे पोर्स ब्लॉक होऊन पिंपल्स येतात. डबल क्लिन्झिंगमुळे पोर्स बंद होत नाहीत आणि ब्लॅकहेड्स-व्हाइटहेड्सची समस्या कायमची दूर होते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

स्किन केअर प्रॉडक्ट्सचे शोषण वाढवते

चेहरा आतून स्वच्छ झाल्यामुळे त्यानंतर लावले जाणारे टोनर, सिरम आणि मॉइश्चरायझर त्वचेमध्ये अगदी खोलवर शोषले जातात, ज्यामुळे त्यांचा 5 पट जास्त आणि वेगवान परिणाम दिसून येतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

कुणी आणि कधी करावे 'डबल क्लिन्झिंग'?

दररोज रात्री झोपण्यापूर्वी ही प्रक्रिया करणे सर्वात योग्य मानले जाते. विशेषतः जे रोज बाहेर पडतात, मेकअप किंवा सनस्क्रीन वापरतात आणि ज्यांची त्वचा ऑयली आहे, त्यांच्यासाठी हा उपाय वरदान ठरतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

ही खबरदारी नक्की घ्या!

त्वचेचा प्रकार ओळखून योग्य क्लिन्झर निवडा. कोरड्या किंवा सेन्सिटिव्ह स्किनसाठी नारळाचे तेल वापरणे टाळा. चेहरा जास्त घासून धुऊ नका, हलक्या हातानेच मसाज करा.

Skin Care Tips | Dainik Gomantak

Gym Tips: वर्कआउटनंतर शरीर रिलॅक्स करण्याचा मास्टर प्लॅन! 'हे' 7 उपाय करतील मसल रिकव्हरी सुस्साट

आणखी बघा