Manish Jadhav
पाण्यात 'एप्सम सॉल्ट' टाकून आंघोळ केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना त्वरित आराम मिळतो.
सूज आणि तीव्र वेदना असणाऱ्या स्नायूंवर 10 ते 15 मिनिटे बर्फाने शेकल्यास दाह कमी होतो.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट हळदीचे दूध प्यायल्याने त्यातील घटक स्नायूंचे दुखणे आतून बरे करतात.
कोमट मोहरी किंवा तिळाच्या तेलाने हलक्या हाताने मसाज केल्याने स्नायूंची जकडन मोकळी होते.
शरीराला हायड्रेटेड ठेवल्याने स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येणे थांबते आणि रिकव्हरी वेगाने होते.
एकाच जागी पडून न राहता 5-10 मिनिटे हलके स्ट्रेचिंग केल्याने स्नायू मोकळे होतात.
7 ते 8 तासांच्या गाढ झोपेमुळे शरीर दुखावलेल्या स्नायूंची आपोआप दुरुस्ती करते.