Manish Jadhav
चेहऱ्याप्रमाणेच संपूर्ण शरीराची त्वचा स्वच्छ करण्यासाठी ऑइल-बेस्ड क्लिंजर आणि फोमिंग वाॅशचा वापर करुन त्वचा डीप क्लिन केली जाते.
शरीरावरील मृत त्वचा (Dead Skin) काढून टाकण्यासाठी कोरियन पद्धतीचे सौम्य नॅचरल बॉडी स्क्रब वापरले जातात, ज्यामुळे त्वचा मुलायम राहते.
आंघोळीनंतर त्वरीत बॉडी लोशन किंवा ऑइल लावून शरीरातील ओलावा (Moisture) लॉक केला जातो, जेणेकरुन त्वचा कायम टवटवीत दिसते.
शरीराचे रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारण्यासाठी आणि त्वचा डिटॉक्स करण्यासाठी कोमट पाण्याचा बाथ किंवा स्पा घेतला जातो.
केवळ चेहऱ्यालाच नाही, तर हात आणि पायांना बाहेर पडण्यापूर्वी उत्तम दर्जाचे सनस्क्रीन लावून सूर्याच्या युव्ही किरणांपासून संरक्षण केले जाते.
कोरियन महिला शरीराला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी, सूप आणि ताजे अन्नपदार्थ सेवनावर विशेष भर देतात.
झोपण्यापूर्वी शरीराला कोरियन फॉर्म्युलायुक्त बॉडी बटर किंवा सिरम लावून त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यास प्राधान्य दिले जाते.