Winter Korean Skincare Routine: थंडीच्या दिवसांत चेहरा धुण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या कोरियन ब्युटी सीक्रेट्स!

Manish Jadhav

गरम पाण्याचा वापर नका

थंडीत चेहरा धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरु नका. यामुळे चेहऱ्यातील नैसर्गिक तेल सुकून त्वचा आणखी जास्त रखरखीत होते.

Winter Korean Skincare Routine | Dainik Gomantak

कोमट पाण्याचा वापरा

चेहरा धुताना नेहमी कोमट पाणीच वापरा. यामुळे त्वचा सुरक्षित राहून चेहऱ्याचा ताजेपणा कायम टिकून राहतो.

Winter Korean Skincare Routine | Dainik Gomantak

कडक फेसवॉश बाजूला ठेवा

उन्हाळ्यासारखा तेलकटपणा काढणारा स्ट्रॉँग फेसवॉश हिवाळ्यात अजिबात लावू नका. त्याऐवजी त्वचा मऊ ठेवणारा क्रिमसारखा हलका आणि सौम्य फेसवॉश वापरा.

Winter Korean Skincare Routine | Dainik Gomantak

टॉवेलने चेहरा रगडून पुसू नका

चेहरा धुतल्यानंतर तो टॉवेलने कधीही जोरजोराने रगडून पुसू नका. त्याऐवजी मऊ कपड्याने हलक्या हाताने हळूवारपणे पाणी टिपून घ्या.

Winter Korean Skincare Routine | Dainik Gomantak

धुतल्याबरोबर लगेच क्रीम लावा

चेहरा पूर्ण कोरडा होण्याआधीच त्यावर लगेच मॉइश्चरायझर वा क्रीम लावा. यामुळे त्वचेतील ओलावा आणि चमक आतल्या आत लॉक होऊन जाते.

Winter Korean Skincare Routine | Dainik Gomantak

वारंवार तोंड धुण्याची सवय सोडा

थंडीच्या दिवसांत दिवसभरात वारंवार चेहरा धुणे टाळा. यामुळे त्वचेचं रक्षण करणारा नैसर्गिक थर खराब होतो, म्हणून दिवसातून फक्त दोनदाच चेहरा धुवा.

Winter Korean Skincare Routine | Dainik Gomantak

चेहऱ्याला चुकूनही साबण लावू नका

अंगाला लावायचा साबण चेहऱ्यासाठी कधीही वापरु नका. साबणातील कडक केमिकल्समुळे हिवाळ्यात त्वचा लगेच पांढरी आणि निस्तेज पडू शकते.

Winter Korean Skincare Routine | Dainik Gomantak

Nahargarh Fort: 9 राण्या, 9 महाल आणि सेम डिझाइन! अरावलीच्या कुशीत वसलेला 'नाहरगड किल्ला', जिथून दिसते गुलाबी नगरी

आणखी बघा