Manish Jadhav
ज्याप्रमाणे आपण शरीराला विश्रांती देण्यासाठी उपवास करतो, तसेच आपल्या त्वचेला सर्व प्रकारच्या केमिकल्स आणि कॉस्मेटिक्सपासून आराम देणे म्हणजेच 'स्किन फास्टिंग' होय.
सतत क्रिम, टोनर, सीरम आणि मेकअप लावल्यामुळे आपली त्वचा थकते. तिला नैसर्गिकरित्या स्वतःला दुरुस्त करण्यासाठी थोड्या आरामाची गरज असते.
आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा असा एक दिवस निवडा, ज्या दिवशी चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची हेवी क्रीम, सीरम किंवा मेकअप लावणार नाही.
या उपवासाच्या दिवशी चेहऱ्यावर फक्त साधे पाणी किंवा अगदी हलका फेसवॉश वापरा. त्यानंतर चेहऱ्यावर कोणतेही मॉइश्चरायझर किंवा केमिकल प्रोडक्ट लावू नका.
असे केल्याने त्वचेचे बंद झालेले रोमछिद्र (Pores) मोकळे होतात आणि त्वचेवर साचलेली घाण पूर्णपणे बाहेर निघून जाते.
सतत उत्पादने वापरल्यामुळे त्वचा स्वतःहून तेल बनवणे सोडून देते. स्किन फास्टिंग केल्यामुळे त्वचा पुन्हा तिचे नैसर्गिक तेल आणि तेज स्वतः तयार करु लागते.
हा सोपा उपाय केल्यास काही दिवसांतच चेहऱ्यावरील थकवा दूर होतो आणि तुमची त्वचा आधीपेक्षा अधिक फ्रेश, नैसर्गिक आणि सुंदर दिसायला लागते.