Sameer Amunekar
तांदळाचे पाणी त्वचेला ताजेपणा आणि मऊपणा देण्यास मदत करू शकते. तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी गाळून चेहऱ्यावर हलकेच लावा.
पेप्टाइड्स त्वचेच्या कोलेजन प्रक्रियेला आधार देतात. त्यामुळे पेप्टाइड्स असलेले सीरम किंवा मॉइश्चरायझर स्किनकेअर रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता.
कोरियन स्किनकेअरमध्ये हायड्रेशनला विशेष महत्त्व दिले जाते. फेस मिस्ट, कोरफड जेल किंवा हायड्रेटिंग शीट मास्कचा वापर त्वचेला ओलावा देण्यासाठी करता येतो.
त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी योग्य मॉइश्चरायझर वापरणे महत्त्वाचे आहे. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार हलके आणि नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर निवडा.
सूर्याच्या अतिनील किरणांमुळे अकाली त्वचा वृद्ध दिसू शकते. त्यामुळे घराबाहेर पडताना SPF 30 किंवा त्याहून अधिक ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे.
त्वचेच्या आरोग्यासाठी पुरेसे पाणी पिणे आणि फळे, भाज्या, प्रथिने व इतर पोषक घटकांचा संतुलित आहार घेणे फायदेशीर ठरू शकते.
ग्लास स्किनसाठी एका दिवसात परिणाम मिळत नाही. नियमित क्लिनिंग, हायड्रेशन, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीनचा वापर ही साधी रुटीन सातत्याने पाळणे अधिक महत्त्वाचे आहे.