Sameer Amunekar
कोरियन स्किन केअरची सुरुवात 'डबल क्लिंजिंग'ने होते. प्रथम ऑईल-बेस्ड क्लिंजरने मेकअप आणि धूळ साफ करा आणि त्यानंतर वॉटर-बेस्ड फोमने चेहरा धुवा, ज्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होईल.
तांदळाचे पाणी हे कोरियन सौंदर्याचे सर्वात मोठे रहस्य आहे. तांदूळ भिजवलेले पाणी टोनर म्हणून वापरल्याने त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
कोरियन ग्लोसाठी त्वचा हायड्रेटेड असणे गरजेचे आहे. यासाठी दिवसातून भरपूर पाणी प्या आणि त्वचेवर 'हॅल्युरोनिक ॲसिड' किंवा 'एसेन्स'चा वापर करा ज्यामुळे त्वचा मऊ आणि टवटवीत दिसेल.
आठवड्यातून किमान दोनदा शीट मास्क वापरा. हे मास्क त्वचेला आवश्यक जीवनसत्त्वे आणि ओलावा पुरवतात, ज्यामुळे चेहरा तत्काळ ग्लो करू लागतो.
त्वचेचा रक्ताभिसरण वाढवण्यासाठी मॉइश्चरायझर लावताना चेहऱ्याला वरच्या दिशेने हलका मसाज करा. यामुळे त्वचा सैल पडत नाही आणि नैसर्गिक लाली येते.
कोरियन महिला ऊन असो वा नसो, सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण केल्यामुळे पिगमेंटेशन आणि अकाली वृद्धत्व रोखता येते.
रात्रीची ७-८ तासांची शांत झोप घेतल्याने त्वचा स्वतःला रिपेअर करते. तसेच आहारात जास्तीत जास्त पालेभाज्या आणि फळांचा समावेश केल्याने आतून ग्लो मिळण्यास मदत होते