Akshata Chhatre
आले हे सर्दी-खोकल्यासाठी औषध म्हणून ओळखले जाते, पण एका कोरियन क्रिएटरने याला तिच्या त्वचेच्या सौंदर्याचे रहस्य सांगितले आहे.
आले खाण्याऐवजी चेहऱ्यावर लावल्यास त्वचेच्या अनेक समस्यांपासून बचाव करता येतो.
हे सीरम चेहरा धुतल्यानंतर वापरण्यासाठी उत्तम आहे. आल्याचे कव्हर काढून टाकून त्याचे पातळ स्लाइस करा. एका पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात आल्याचे काप टाका. पाण्याचा रंग हलका पांढरा होईपर्यंत उकळू द्या.
उकडलेले आल्याचे तुकडे घ्या आणि थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या आल्याच्या लिक्विडमध्ये पीठ आणि मध मिसळून एक पेस्ट तयार करा.
या मिश्रणाला वरून झाकून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. हा फेस पॅक तुम्ही ५ ते १० मिनिटांसाठी कधीतरी वापरू शकता.
आले हे तिखट असल्यामुळे ते त्वचेला नुकसान पोहोचवू शकते.
ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी हे उपाय वापरणे टाळावे.हे दोन्ही उपाय चेहऱ्यावर लावण्यापूर्वी, त्वचेच्या लहान भागावर पॅच टेस्ट करणे अनिवार्य आहे.