Sameer Amunekar
आरे-वारे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे.
गर्दीपासून दूर असल्यामुळे शांतता अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण.
सुरेख पांढरी वाळू आणि स्वच्छ निळसर पाणी ही प्रमुख वैशिष्ट्यं आहेत.
हिरवी गार झाडं आणि निसर्गरम्य परिसरामुळे मन प्रसन्न होते.
सकाळचा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी उत्कृष्ट लोकेशन आहे.
फोटोग्राफीसाठी परफेक्ट स्पॉट आहे. निसर्गरम्य दृश्यांची रेलचेल येथे पाहायला मिळते.
रस्ते चांगले असून दुचाकी किंवा कारने सहज पोहोचता येते.