Konkan Tourism: परदेशात जाण्यापेक्षा कोकणच भारी! सिंधुदुर्गातील समुद्रकिनारे, किल्ले अन् निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी 'ही' 7 ठिकाणं बेस्ट

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा ऐतिहासिक जलदुर्ग मालवणच्या समुद्रात वसलेला आहे. किल्ल्याची भव्य तटबंदी आणि बोटीतून होणारा प्रवास पर्यटकांना आकर्षित करतो.

Best Places to Visit in Sindhudurg | Dainik Gomantak

तारकर्ली समुद्रकिनारा

निळेशार समुद्र, स्वच्छ वाळू आणि शांत वातावरणासाठी तारकर्ली प्रसिद्ध आहे. स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग यांसारख्या जलक्रीडांचा आनंद घेण्यासाठीही हे लोकप्रिय ठिकाण आहे.

Best Places to Visit in Sindhudurg | Dainik Gomantak

देवबाग संगम

करली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाचे निसर्गरम्य दृश्य येथे पाहायला मिळते. बोटिंग, डॉल्फिन सफारी आणि समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर दृश्यांचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

Best Places to Visit in Sindhudurg | Dainik Gomantak

आंबोली घाट

धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवीगार वनराई आणि धबधबे यांमुळे आंबोली पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. विशेषतः पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य खुलून दिसते.

Best Places to Visit in Sindhudurg | Dainik Gomantak

भोगवे समुद्रकिनारा

गर्दीपासून दूर शांत समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवायचा असेल, तर भोगवे उत्तम पर्याय आहे. निसर्गरम्य किनारा, नारळी-पोफळीची झाडे आणि फोटोग्राफीसाठी सुंदर दृश्ये हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे.

Best Places to Visit in Sindhudurg | Dainik Gomantak

सावंतवाडी राजवाडा, मोती तलाव

सावंतवाडीचा ऐतिहासिक राजवाडा, मोती तलाव आणि प्रसिद्ध लाकडी खेळणी पर्यटकांना आकर्षित करतात. कोकणचा सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी या ठिकाणाला नक्की भेट द्या.

Best Places to Visit in Sindhudurg | Dainik Gomantak

वेंगुर्ला समुद्रकिनारा

निसर्गरम्य समुद्रकिनारा, हिरव्यागार टेकड्या आणि माडा-पोफळीच्या बागांनी नटलेला वेंगुर्ला मन प्रसन्न करतो. निवांत वेळ घालवण्यासाठी आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हे सुंदर पर्यटनस्थळ आहे.

Best Places to Visit in Sindhudurg | Dainik Gomantak

हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या मुख्य कारणे आणि तातडीचा पहिला उपाय

येथे क्लिक करा