Plant Care Tips: हिवाळ्यात घरातील रोपं आणि फुलझाडं टवटवीत ठेवण्यासाठी ट्रिक्स

Sameer Amunekar

उजेडात ठेवा

हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळतो. त्यामुळे रोपांना सकाळचा हलका आणि नैसर्गिक प्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.

Plant Care Tips | Dainik Gomantak

पाण्याचे प्रमाण कमी करा

थंड हवेत माती कोरडी होण्यास वेळ लागतो. वारंवार पाणी घातल्यास मुळांत कुज येऊ शकते. माती थोडी कोरडी झाल्यावरच पाणी द्या.

Plant Care Tips | Dainik Gomantak

हलका स्प्रे करा

हिवाळ्यात हवा कोरडी होत असल्याने पानांवर हलक्या गार पाण्याचा स्प्रे करा, यामुळे आर्द्रता टिकून राहते आणि पानं तजेलदार दिसतात.

Plant Care Tips | Dainik Gomantak

खत कमी वापरा

हिवाळ्यात वाढ मंदावते, त्यामुळे खतांचा वापर कमी करा. हवामान उबदार झाल्यावरच नियमित खते द्या.

Plant Care Tips | Dainik Gomantak

थंड वार्‍यापासून संरक्षण

खिडक्या, दारांमधून येणाऱ्या थंड झोतापासून दूर ठेवा. रात्री पडदे लावून किंवा रोपं थोडी आत हलवून ठेवा.

Plant Care Tips | Dainik Gomantak

स्वच्छता राखा

पानांवर धूळ, मळ साचल्यास प्रकाश शोषण कमी होते. ओल्या कापडाने किंवा मऊ ब्रशने पानं स्वच्छ करा.

Plant Care Tips | Dainik Gomantak

तापमान

झाडं थेट उष्ण ठिकाणी ठेवू नका. मध्यम तापमानात रोपं अधिक निरोगी राहतात.

Plant Care Tips | Dainik Gomantak

विदेशी पर्यटकांना वेड लावणारं 'शिरोडा' बीच

Konkan Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा