Konkan Tourism: नारळ, काजू आणि सुपारीच्या बागांनी नटलेलं! ट्रिपसाठी कोकणातील 'वेंगुर्ला' आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Sameer Amunekar

निसर्गसंपन्न ठिकाण

फोंडा घाटापासून साधारण दीड तासांवर वसलेले वेंगुर्ला हे हिरवाईने नटलेले शांत पर्यटनस्थळ आहे. घनदाट झाडीत वसलेले हे गाव पर्यटकांना निसर्गाच्या सहवासाचा अनोखा अनुभव देते.

Konkan Tourism | Dainik Gomantak

गोव्याच्या अगदी जवळ

वेंगुर्ला हे गोव्यापासून अवघ्या तीन तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे गोवा आणि कोकण असे दोन्ही ठिकाणे पाहू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी वेंगुर्ला अतिशय सोयीचे ठिकाण मानले जाते.

Konkan Tourism | Dainik Gomantak

वेंगुर्ला बाजाराची चहल-पहल

वेंगुर्ला बाजार क्षेत्र गजबजलेले असले तरी थोडे पुढे जाताच शांतता भेटते. या विरोधाभासामुळे शहर आणि गाव या दोन्ही वातावरणांचा अनुभव प्रवाशांना मिळतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

कोकणी कौलारू घरांचा वारसा

प्रचंड पावसामुळे खास उतरत्या छपराच्या शैलीतील कौलारू घरे इथं आढळतात. ही पारंपरिक कोकणी घरे शहरी भागातील लोकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतात.

Konkan Tourism | Dainik Gomantak

जुन्या ख्रिश्चन वस्त्यांचे सौंदर्य

वेंगुर्ल्यात ख्रिश्चन बांधवांच्या जुन्या घरांनी सजलेल्या वसाहती आजही जतन करून ठेवलेल्या आहेत. ही घरे आणि स्थानिक वस्ती ‘जुने गाव’ अशी वेगळी ओळख जिवंत ठेवतात.

Konkan Tourism | Dainik Gomantak

बागायती

पोफळीच्या, सुपारीच्या, केळीच्या बागा, नारळाची झाडे, काजूची मळे आणि शेकडो प्रकारच्या वृक्षांनी वेढलेले वेंगुर्ला हे बागायती क्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

पर्यटनस्थळ

निसर्ग, शांतता, संस्कृती, पारंपरिक घरे आणि समृद्ध हरितदृश्य यांचा संगम असलेले वेंगुर्ला हे ठिकाण एकदा तरी नक्कीच भेट देण्यासारखे आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

हिवाळ्यात पाणी व्यवस्थापनाचे अचूक गणित

Winter Plant Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा