Sameer Amunekar
हिरवळ, निळाशार समुद्र आणि थंड हवेचा आनंद घ्यायचा असेल तर वेंगुर्ला किनारा हा फिरण्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे.
आजूबाजूची हिरवीगार झाडं, स्वच्छ निळा समुद्र आणि मोकळं आकाश पाहिलं की क्षणात ताण विसरायला होतो.
प्रचंड गर्दी नसल्याने वेंगुर्ला बीचवर मनसोक्त शांतता अनुभवता येते.
एकट्याने वेळ घालवायचा असेल, स्वतःशी संवाद साधायचा असेल तर वेंगुर्ला किनारा उत्तम ठिकाण आहे.
संध्याकाळचा सूर्यास्त, समुद्राची लाटांची गाज आणि थंड वारा रोमँटिक क्षणांसाठी परफेक्ट वातावरण.
येथील किनारा स्वच्छ असल्याने फिरताना वेगळाच फ्रेशनेस जाणवतो.
निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफर्ससाठी वेंगुर्ला म्हणजे सोन्याची खाण सनसेट, समुद्र आणि हिरवळ एकाच फ्रेममध्ये.
हॉटेल्स, स्थानिक जेवण आणि प्रवास खर्चिक नसल्याने कमी बजेटमध्येही छान ट्रिप करता येते.