Sameer Amunekar
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील वेळास बीच हा शुद्ध निसर्गाचा अनुभव देणारा लोकप्रिय इको-टुरिझम स्पॉट आहे. येथे शांतता, स्वच्छ किनारा आणि जंगलाचा सुगंध मनाला भुरळ घालतो.
वेळास हा पश्चिम घाटाच्या (UNESCO World Heritage Site) सुरूवातीच्या भागात असल्याने येथील जैवविविधता आणि वातावरण विशेष आकर्षक आहे.
दरवर्षी हजारो ऑलिव्ह रिडले (Olive Ridley Turtles) कासव वेळासच्या शांत किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. कासवांच्या संरक्षणासाठी हे भारतातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.
संध्याकाळी सूर्य मावळताना कासवांच्या पिल्लांचा समुद्राकडे सुरू होणारा पहिला प्रवास पाहणे हा आयुष्यातील रोमांचक आणि भावूक करणारा क्षण असतो.
दरवर्षी फेब्रुवारी ते मे दरम्यान वेळास गावात Turtle Festival आयोजित केला जातो. येथे पर्यटक, स्वयंसेवक आणि स्थानिक लोक एकत्र येऊन कासव संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करतात.
साधारण फेब्रुवारी ते एप्रिल हा कासवांची अंडी उबवण्याचा हंगाम असतो. या काळात बीचवरील सर्व हालचाली काळजीपूर्वक व्यवस्थापित केल्या जातात.
भारताच्या विविध किनारपट्ट्यांवर कासवांची स्थलांतर स्थाने असली तरी वेळास बीच हे कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी कासव संवर्धन केंद्र मानले जाते.