Couple Romantic Destinations: पावसाळी सहलीसाठी बेस्ट! जोडीदारासोबत 'ही' ठिकाणं नक्की पाहा

Sameer Amunekar

पावसाळा

पावसाळा म्हणजे निसर्गाचं लाजवंळ रूप, थोडंसे कुजबुजणारे ढग, झिम्माड पाऊस आणि हिरवाईचा साज.

Konkan Scenic Destinations | Dainik Gomantak

निसर्ग

पावसाळ्यात आपल्या जोडीदारासोबत कुठेतरी शांत, आल्हाददायक आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याची मजा काही औरच असते.

Konkan Scenic Destinations | Dainik Gomantak

लोनावळा आणि खंडाळा

पावसाळ्यात सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांपैकी हे एक. हिरवागार परिसर, नयनरम्य धबधबे, डोंगरदऱ्या आणि ढगांत हरवलेलं वातावरण हे या दोन्ही ठिकाणांचं वैशिष्ट्य आहे.

Konkan Scenic Destinations | Dainik Gomantak

आंबोली घाट

कोकणातील आंबोली हे पावसाळ्यातल्या सहलीसाठी आदर्श ठिकाण आहे. धुक्याने भरलेले रस्ते, रस्त्याच्या कडेला वाहणारे लहान मोठे धबधबे आणि दाट जंगलं – प्रेमिकांसाठी स्वर्गासारखी अनुभूती देणारं असतं.

Konkan Scenic Destinations | Dainik Gomantak

माळशेज घाट

प्रत्येक पावसाळ्यात निसर्गप्रेमींना वेड लावणारा घाट म्हणजे माळशेज घाट. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा घाट धबधब्यांनी, हिरवाईने आणि ढगांच्या खेळाने भरलेला असतो.

Konkan Scenic Destinations | Dainik Gomantak

चिकमंगळूर

जर तुम्हाला थोडं हटके आणि शांत ठिकाण हवं असेल, तर चिकमंगळूर तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कॉफीचे मळे, पावसाच्या सरी, धुके आणि थंडगार हवामान तुम्हाला एक वेगळीच अनुभूती देतील.

Konkan Scenic Destinations | Dainik Gomantak
Konkan Famous Waterfall | Dainik Gomantak
येथे क्लिक करा