Sameer Amunekar
कोकण हे आपल्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते.
कोकणातील डोंगरदऱ्या, हिरवीगार जंगलं आणि कोसळणारे धबधबे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच.
पावसाळा सुरू झाला की, कोकणातले अनेक धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील पानवल गावाजवळ वसलेला हा धबधबा अगदी जंगलाच्या कुशीत आहे. पावसाळ्यात तो प्रचंड जलप्रपात बनतो आणि त्याचं तेजस्वी पाणी पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत असलेला बाबा धबधबा हा अत्यंत प्रसिद्ध आणि आकर्षक धबधबा आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा भाग पावसाळ्यात धुक्याच्या आणि हिरवळीच्या साम्राज्यात बदलतो.
राजापूरपासून जवळ असलेला सवतकडा धबधबा कोकणातल्या फारशा प्रसिद्ध नसलेल्या पण अप्रतिम धबधब्यांपैकी एक आहे. या धबधब्याला "कोकणचा गुप्त रत्न" म्हणायला हरकत नाही.