Sameer Amunekar
सोनेरी वाळू, निळेभोर पाणी आणि नारळाच्या बागांनी वेढलेले किनारे पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जातात.
आता हे किनारे केवळ विश्रांतीपुरते मर्यादित न राहता सर्फिंग, कयाकिंग आणि अन्य जलक्रीडांसाठी जागतिक स्तरावर ओळखले जात आहेत.
ओम बीच आणि कुडले बीच त्यांच्या अर्धवर्तुळाकार रचनेमुळे प्रसिद्ध असून शांत वातावरणासाठी ओळखले जातात.
एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सौपर्णिका नदी असलेला अनोखा रस्ता पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो.
समुद्राला थेट भिडणारे खडकाळ कडे आणि रंगीबेरंगी सूर्यास्त हे भारतात दुर्मिळ दृश्य आहे.
तीन चंद्राकृती किनारे, सुरक्षित पोहणे आणि दीपगृह हे प्रमुख आकर्षण आहे.
महाबलीपुरम, विशाखापट्टणम आणि पॉंडिचेरी येथे संस्कृती, साहस आणि शांततेचा सुंदर संगम अनुभवता येतो.