Sameer Amunekar
तारकर्ली बीच कोकणातील अतिशय स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असून येथील निळसर पाणी आणि शुभ्र वाळू पर्यटकांना भुरळ घालते.
महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध स्कुबा डायव्हिंग स्पॉट म्हणून तारकर्लीची ओळख आहे. येथे रंगीबेरंगी मासे आणि प्रवाळ पाहता येतात.
करळी नदीच्या मुखाशी असलेल्या हाऊसबोट्स आणि बॅकवॉटर बोटिंग हा येथे खास आकर्षण ठरतो.
तारकर्लीवरील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी अनेक पर्यटक खास येतात.
शांत वातावरण, कमी गर्दी आणि सुरक्षित किनारा यामुळे कुटुंबासोबत फिरण्यासाठी तारकर्ली आदर्श आहे.
येथील मालवणी मासे, सोलकढी, कोळंबी, सुरमई, बांगडा हे पदार्थ पर्यटकांची खास पसंती आहेत.
ऑक्टोबर ते मार्च हा तारकर्ली भेटीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.