Sameer Amunekar
झोपण्यापूर्वी नारळ, बदाम किंवा एरंडेल तेल कोमट करून ५–१० मिनिटे हलक्या हाताने मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते.
ओले केस बांधून झोपू नका. ओलसरपणामुळे केस तुटणे आणि कोंडा वाढू शकतो.
झोपण्यापूर्वी रुंद दातांच्या कंगव्याने केस मोकळे करा. गुंतागुंत कमी होते व केस गळणे थांबते.
आठवड्यात २–३ वेळा टाळूवर अॅलोव्हेरा जेल लावून ठेवा. केस मुळांपासून मजबूत होतात.
खूप खरबरीत उशीच्या कव्हरमुळे केस तुटतात. मऊ कव्हर केसांसाठी फायदेशीर ठरते.
घट्ट वेणी किंवा रबरबँड टाळा. सैल वेणी किंवा मोकळे केस ठेवल्यास ताण कमी होतो.
रोज किमान ७–८ तास झोप घेतल्यास हार्मोन्स संतुलित राहतात व केसांची वाढ वेगाने होते.