Konkan Tourism: निळा समुद्र अन् स्वच्छ पांढरी वाळू! उन्हाळ्यात फिरण्यासाठी कोकणातील 'हे' किनारे आहेत बेस्ट

Sameer Amunekar

तारकर्ली

मालवणमधील तारकर्ली आपल्या पारदर्शक पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात येथे स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगचा आनंद लुटता येतो. येथील 'हाऊस बोट' स्टे तुम्हाला स्वर्गीय अनुभव देईल.

Konkan Tourism | Dainik Gomantak

गणपतीपुळे

रत्नागिरीतील हे ठिकाण धार्मिक आणि पर्यटन अशा दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे आहे. मंदिराच्या अगदी जवळ असलेला स्वच्छ समुद्रकिनारा आणि तिथला सूर्यास्त मनाला भुरळ घालतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

गुहागर

अथांग पसरलेला समुद्र आणि किनाऱ्यालगत असलेल्या नारळ-पोफळीच्या बागा उन्हाळ्यात कमालीचा थंडावा देतात. शांतता हवी असणाऱ्या पर्यकांसाठी गुहागर हा उत्तम पर्याय आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

आंजर्ले

दापोली जवळील आंजर्ले बीच हा 'टर्टल फेस्टिवल'साठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला येथे कासवांची छोटी पिल्ले समुद्रात जाताना पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

दिवेआगर

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथील लांबच लांब पसरलेली चौपाटी आणि सुरुची झाडे उन्हाळ्याच्या दुपारीही गारवा टिकवून ठेवतात.

Konkan Tourism | Dainik Gomantak

भोगवे

सिंधुदुर्गमधील हे एक 'हिडन जेम' आहे. एका बाजूला कर्ली नदीचा संगम आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र. येथील शांतता आणि निळे पाणी पाहून तुम्ही परदेशातील बीच विसराल.

Konkan Tourism | Dainik Gomantak

उन्हाळी पर्यटनासाठी टीप!

कोकणात उन्हाळ्यात जाताना सुती कपडे, सनग्लासेस आणि हॅट सोबत ठेवा. तसेच कोकणी मेजवानीत 'सोलकढी'चा आस्वाद घ्यायला विसरू नका, जी शरीराला नैसर्गिक थंडावा देते.

Konkan Tourism | Dainik Gomantak

कोरियन ग्लास स्किनसाठी फॉलो करा 'हे' नैसर्गिक उपाय

Korean Glass Skin: | Dainik Gomantak
येथे क्लिक करा