Sameer Amunekar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेला शिरोडा बीच त्याच्या पांढऱ्या शुभ्र वाळू आणि निळ्याशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. व्यावसायिक गजबजाटापासून दूर, हा किनारा अतिशय शांत आणि स्वच्छ आहे.
संध्याकाळच्या वेळी येथील विस्तीर्ण समुद्रात होणारा सूर्यास्त पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हा नजराणा कॅमेऱ्यात कैद करण्यासारखाच आहे.
शिरोडा बीचजवळच आरवली गावचे आराध्य दैवत श्री देव वेतोबा मंदिर आहे. या जागृत देवस्थानला आणि वेतोबाच्या भव्य मूर्तीला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक येथे येतात.
शांत वाटणाऱ्या या किनाऱ्यावर पर्यटकांसाठी बनाना राईड, जेट स्की आणि बंपर राईड यांसारखे विविध वॉटर स्पोर्ट्स (Water Sports) देखील उपलब्ध आहेत.
शिरोडा आणि आसपासच्या परिसरात अस्सल मालवणी पद्धतीचे जेवण मिळते. ताजी मासळी, सोलकढी आणि कोकणी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
शिरोडा बीचला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा काळ सर्वात बेस्ट मानला जातो. या दिवसांत येथील हवामान अतिशय आल्हाददायक असते.
जवळचे रेल्वे स्टेशन: सावंतवाडी रोड (सुमारे २५ किमी) किंवा कुडाळ, जवळचा विमानतळ: चिपी विमानतळ (सिंधुदुर्ग) किंवा मोपा विमानतळ (गोवा). गोव्याच्या सीमेजवळ असल्याने पणजीवरूनही येथे सहज येता येते.