Sameer Amunekar
शिरोडा बीच इतर प्रसिद्ध गोवा बीचपेक्षा शांत आहे. इथे मोठी गर्दी नसल्यामुळे जोडप्यांना हव्या त्या निवांत क्षणांचा अनुभव मिळतो.
समुद्राकडून येणारा गार वारा आणि उघडं आकाश मनाला शांतता देतं. संध्याकाळची वेळ तर खासच रोमॅंटिक वाटते.
बीचच्या आजूबाजूला झाडं एकांतासाठी नैसर्गिक कव्हर देतात, ज्यामुळे प्रायव्हसी अधिक मिळते.
शिरोडा परिसरात बजेटमध्ये चांगले हॉटेल्स, होमस्टे आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. बीचपासून फार दूर जावं लागत नाही.
इथला सूर्यास्त जोडप्यांसाठी अविस्मरणीय ठरतो. समुद्रकिनारी बसून शांतपणे सनसेट पाहण्याची मजा वेगळीच.
मोठ्या पार्टी, लाऊड म्युझिकपासून दूर असल्याने मनसोक्त संवाद साधता येतो, एकमेकांसोबत वेळ घालवता येतो.
खर्च कमी आणि अनुभव जबरदस्त त्यामुळे कपल्ससाठी शिरोडा बीच ‘Hidden Romantic Destination’ ठरतो.