Sameer Amunekar
नारळ तेल + एरंडेल तेल + थोडं बदाम तेल मिसळून हलक्या हाताने टाळूची मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण वाढून केसांची मुळे मजबूत होतात.
कांद्याचा रस टाळूवर लावा आणि 20–30 मिनिटांनी सौम्य शॅम्पूने धुवा. आठवड्यातून 1 वेळा केल्यास नवीन केस उगवायला मदत होते.
खूप गरम पाणी केसांना कोरडे व कमकुवत बनवतं. नेहमी कोमट किंवा थंड पाण्यानेच केस धुवा.
डाळी, अंडी, दही, दूध, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या आहारात असू द्या. आतून पोषण मिळालं तरच केस वाढतात.
कोरफड जेल + नारळ तेल + विटॅमिन E कॅप्सूल मिसळून केसांना लावा. 30 मिनिटांनी धुवा – केस होतील मऊ, घनदाट आणि चमकदार.
ओले केस खूप नाजूक असतात. आधी सुकू द्या, मग रुंद दातांच्या कंगव्यानेच विंचरा.
सततचा ताण हेअर फॉलचं मोठं कारण आहे. दररोज किमान 7–8 तास झोप घ्या आणि मन शांत ठेवा.