Manish Jadhav
रेवदंडा हा अलिबागपासून साधारण 17 किमी अंतरावर असलेला एक अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा आहे. अलिबागच्या तुलनेत येथे गर्दी कमी असल्याने शांतता शोधणाऱ्या पर्यटकांसाठी हे हक्काचे ठिकाण आहे.
रेवदंडा किनाऱ्यावर रुपेरी रंगाची मऊ वाळू पसरलेली आहे. किनाऱ्यालगत असलेल्या सुरुच्या झाडांमुळे इथल्या सौंदर्यात अधिकच भर पडते आणि कडक उन्हातही शीतल सावली मिळते.
या किनाऱ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 'रेवदंडा किल्ला'. या किल्ल्याच्या तटबंदीच्या अवशेषांमधून समुद्रकिनारा पाहण्याचा अनुभव थक्क करतो. हा किल्ला पोर्तुगीज स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे.
आजकाल रेवदंडा हे बीच साईड कॅम्पिंगसाठी महाराष्ट्रात अव्वल स्थानी आहे. रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर तंबू ठोकून शेकोटी आणि संगीताचा आनंद घेण्यासाठी तरुण पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात.
साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठी येथे पॅरासेलिंग, जेट स्की, बनाना राईड आणि बंपर राईड यांसारखे विविध वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. समुद्राचे पाणी उथळ असल्याने हे खेळ सुरक्षित मानले जातात.
रेवदंडा किनाऱ्यावरुन दिसणारा सूर्यास्त मनाला भुरळ घालतो. समुद्राच्या निळ्या पाण्यात बुडणारा लाल-नारंगी सूर्य आणि किल्ल्याचे अवशेष यामुळे फोटोग्राफीसाठी हे एक खास ठिकाण बनले आहे.
रेवदंडा फिरताना तुम्ही जवळच असलेले बिर्ला मंदिर आणि कोर्लाई किल्ला यांनाही भेट देऊ शकता. कोर्लाई किल्ल्यावरुन रेवदंडा खाडीचे विहंगम दृश्य दिसते.