Sameer Amunekar
आंजर्ले हा दापोली तालुक्यातील अत्यंत शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा मानला जातो.
येथील पांढरी शुभ्र वाळू आणि निळसर समुद्र यांचा संगम पर्यटकांना वेड लावणारा आहे.
फोटोग्राफी, प्री-वेडिंग शूट आणि निसर्गचित्रणासाठी हे ठिकाण ‘परफेक्ट स्पॉट’ मानले जाते.
आंजर्ले परिसरात गर्दी तुलनेने कमी असल्यामुळे कुटुंबासह शांत वेळ घालवण्यासाठी आदर्श ठिकाण आहे.
किनाऱ्याभोवती नारळाची आणि सुपारीची दाट झाडे असल्याने संपूर्ण परिसरात नैसर्गिक हिरवाईची अनुभूती मिळते.
येथे सूर्यास्ताचा नजारा अत्यंत मोहक असून संध्याकाळी अनेक पर्यटक हा नजारा टिपण्यासाठी येतात.
आंजर्ले बीचच्या जवळच प्राचीन श्री गणेश मंदिर आणि सुंदर ग्रामीण कोकणी संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळते.