Manish Jadhav
अलिबागपासून अवघ्या 12 किमी अंतरावर असलेला किहीम समुद्रकिनारा त्याच्या शांत आणि निवांत वातावरणासाठी ओळखला जातो. मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय 'वीकेंड डेस्टिनेशन' आहे.
या किनाऱ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील दाट नारळ आणि सुपारीच्या (पोफळीच्या) बागा. किनाऱ्याला लागूनच असलेल्या या बागांमुळे इथली हवा नेहमीच आल्हाददायक आणि गार राहते.
किहीम केवळ समुद्रकिनाऱ्यासाठीच नाही, तर दुर्मिळ फुलपाखरे आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठीही प्रसिद्ध आहे. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
शांतता हवी असणाऱ्यांसोबतच साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठीही येथे सोय आहे. पॅरासेलिंग, जेट स्की आणि बनाना राईड यांसारख्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता.
येथील वाळू पांढरट रंगाची असून ती अत्यंत स्वच्छ आहे. इतर गजबजलेल्या किनाऱ्यांच्या तुलनेत किहीम खूपच स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त असल्याने पर्यटकांना येथे फिरणे मनापासून आवडते.
किहीमच्या किनाऱ्यावरुन दिसणारा सूर्यास्त डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. समुद्राच्या क्षितिजावर रंगांची उधळण पाहण्यासाठी संध्याकाळी येथे मोठी गर्दी होते.
किहीमच्या जवळच प्रसिद्ध 'कनकेश्वर मंदिर' आणि 'कुलाबा किल्ला' आहे. एकाच ट्रिपमध्ये तुम्ही या दोन्ही ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता.