Sameer Amunekar
सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्रातील पर्यटनदृष्ट्या सर्वात आकर्षक जिल्ह्यांपैकी एक मानला जातो.
जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याच्या केसरी या निसर्गरम्य गावात वसलेलं फीश थीम पार्क हे एक अत्यंत प्रेक्षणीय ठिकाण आहे.
खासकरून एक दिवसाच्या पर्यटनासाठी आदर्श ठरणारं हे ठिकाण, सध्या स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
फीश थीम पार्क हे नाव ऐकताच अनेकांच्या डोळ्यासमोर जलजीवांच्या अद्भुत दुनियेचं चित्र उभं राहतं, आणि हेच वास्तवात साकारलं आहे केसरी गावात.
फीश थीम पार्कमध्ये प्रामुख्याने विविध प्रकारचे मासे, त्यांची माहिती, त्यांच्या जगण्याच्या पद्धती, खाद्य साखळी, जीवनचक्र इत्यादींचं उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आलं आहे.
देशी आणि विदेशी मास्यांची विविध प्रजाती येथे बघायला मिळतात. रंगीबेरंगी मासे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालतात.