Konkan Tourism: चेरापुंजी फेल! पावसाळ्यात कोकणात अनुभवा निसर्गाचा खरा थरार; 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

Sameer Amunekar

महाराष्ट्राचे 'चेरापुंजी'

आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, येथे पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे याला 'महाराष्ट्राचे चेरापुंजी' असे म्हटले जाते. पावसाळ्यात हे ठिकाण पूर्णपणे ढगांनी वेढलेले असते.

amboli monsoon tourism | Dainik Gomantak

निसर्गरम्य धबधबे

पावसाळ्यात आंबोली धबधबा (Amboli Waterfall) पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतो. येथील फेसाळणारे पाणी आणि सभोवतालची हिरवीगार वनराई पर्यटकांना भुरळ घालते.

amboli monsoon tourism | Dainik Gomantak

हिरवीगार निसर्गसंपदा

पावसाच्या आगमनानंतर आंबोलीचा परिसर जणू हिरवा शालू पांघरतो. चोहोबाजूंनी डोंगररांगा आणि घनदाट जंगल यामुळे इथले वातावरण अत्यंत प्रसन्न आणि शांत असते.

amboli monsoon tourism | Dainik Gomantak

निसर्गाचा थरार: धुके आणि ढग

येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे धुक्याची चादर. काही क्षणांतच सर्व काही धुक्यात हरवून जाते, ज्यामुळे हा अनुभव एखाद्या थरारक चित्रपटासारखा वाटतो.

amboli monsoon tourism | Dainik Gomantak

'महाकाय' आणि दुर्मिळ जीवसृष्टी

आंबोली हे जैवविविधतेने नटलेले आहे. पावसाळ्यात येथे अनेक दुर्मिळ बेडूक, साप, फुलपाखरे आणि कीटक पाहायला मिळतात, जे निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफरसाठी पर्वणीच असते.

amboli monsoon tourism | Dainik Gomantak

सनसेट पॉईंट

इथल्या प्रसिद्ध महादेव पॉईंटवरून दिसणारे पावसाळी ढगांचे खेळ आणि दरीचे विहंगम दृश्य पर्यटकांच्या मनाचा ठाव घेते. पाऊस कमी असताना इथले सूर्यास्तही मनमोहक असतात.

amboli monsoon tourism | Dainik Gomantak

पावसाळी भटकंतीसाठी सर्वोत्तम

जर तुम्हाला पावसाचा आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर आंबोली हे तुमच्या विकेंड ट्रिपसाठी एक उत्तम आणि सुरक्षित ठिकाण आहे. येथील शांतता तुमच्या मनाला नक्कीच तरतरी देईल.

amboli monsoon tourism | Dainik Gomantak

पावसाळ्यात हवंय निरोगी आरोग्य? मग रोज सकाळी प्या कोमट पाणी!

Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा