Sameer Amunekar
तारकर्ली हा कोकणातील सर्वात शांत आणि स्वच्छ किनाऱ्यांपैकी एक आहे. गर्दी कमी असल्याने एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी हा आदर्श पर्याय ठरतो. निळाशार पाणी, मऊ वाळू आणि शांत वातावरण मनाला विश्रांती देते.
येथील नदी-समुद्र संगम पाहणे ही एक अनोखी अनुभूती आहे. सकाळच्या वा संध्याकाळच्या वेळेत शांततेचा अनुभव घेण्यासाठी देवबाग हा परफेक्ट स्पॉट आहे. एकट्याने बसून निसर्गात स्वतःशी संवाद साधण्यासाठी उत्तम ठिकाण.
एकटा प्रवास करताना सुरक्षित, स्वच्छ आणि आध्यात्मिक वातावरण हवे असेल तर गणपतीपुळे सर्वोत्तम. सुवर्ण किनारा, पारदर्शक पाणी आणि टेकड्यांमधील मंदिरे मनाला समाधान देतात.
कोकणातील कमी प्रसिद्ध पण अत्यंत सुंदर ठिकाण. मंद पाण्याचे लाटा, जुन्या देवळांचे वातावरण आणि कमी गर्दी हे एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी खास आकर्षण आहे. शांतपणे फिरण्यासाठी उत्तम.
दिवेआगरमध्ये विस्तीर्ण समुद्रकिनारा, शांत वातावरण आणि कोकणी घरांची रांग येणाऱ्या पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देते. एकटा प्रवासी सहजपणे फिरू शकतो आणि निसर्गात वेळ घालवू शकतो.
या ठिकाणाला भेट देताना समुद्राकाठचा किल्ला, शांत किनारा आणि निसर्गाची जवळीक हे सर्व अनुभवायला मिळते. सुंदर फोटोग्राफी आणि एकांतात वेळ घालवण्यासाठी परफेक्ट.
गर्दीपासून दूर, स्वच्छ आणि जणू नैसर्गिकरीत्या जपलेले हे बीच एकट्याने भटकंती करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम. शांततेत चालणे, बसून लाटांचा आवाज ऐकणे—मन पूर्णपणे ताजेतवाने होते.