Konkan Tourism: फिरायला जायचंय? यंदाच्या व्हेकेशनसाठी निवडा कोकणातील 'ही' बेस्ट ठिकाणे

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग किल्ला (मालवण)

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला सागरी किल्ला म्हणजे इतिहासाचा जिवंत साक्षीदार. अरबी समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला हा किल्ला स्थापत्य, पराक्रम आणि सागरी संरक्षणकलेचा अद्भुत अनुभव देतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

देवबाग बीच

गर्दीपासून दूर, शांत आणि स्वच्छ किनारा हवा असेल तर देवबाग सर्वोत्तम. येथे डॉल्फिन दर्शन, सूर्यास्त आणि स्थानिक मासेमारी संस्कृती जवळून अनुभवता येते.

Konkan Tourism | Dainik Gomantak

विजयदुर्ग किल्ला

कोकणातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक. जलदुर्गाची भव्य तटबंदी, गुप्त बोगदे आणि सागरी युद्धांचा इतिहास अभ्यासकांसाठी खास आकर्षण ठरतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

गुहागर

निळेशार समुद्रकिनारे, नारळ–सुपारीची बागायत आणि साधी-सोपी कोकणी संस्कृती—गुहागर म्हणजे निसर्ग आणि शांततेचा संगम. कुटुंबासोबत निवांत सुट्टीसाठी योग्य.

Konkan Tourism | Dainik Gomantak

तारकर्ली

स्वच्छ पाणी, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग आणि कोकणी खाद्यसंस्कृती. तारकर्ली म्हणजे साहस आणि आराम यांचा उत्तम समतोल.

Konkan Tourism | Dainik Gomantak

आंबोली

सिंधुदुर्गातील आंबोली हे ठिकाणं पर्यटांमध्ये विशेष प्रसिध्द आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

औषधांशिवाय शांत झोप! खास महिलांसाठी 7 नैसर्गिक उपाय

Women Health | Dainik Gomantak
येथे क्लिक करा