Sameer Amunekar
सफरचंद जास्त चमकदार दिसत असल्यास त्यावर वॅक्स किंवा रासायनिक कोटिंग केलेले असण्याची शक्यता असते. नैसर्गिक सफरचंदांचा रंग थोडा फिका आणि असमान असतो.
अनेक व्यापारी सफरचंदांची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी कृत्रिम वॅक्स, इथिलीन गॅस किंवा केमिकल्स वापरतात, ज्यामुळे ते जास्त दिवस ताजे दिसतात.
सफरचंदावर लावलेले वॅक्स किंवा रासायनिक थर फक्त पाण्याने निघत नाही. त्यासाठी कोमट पाणी आणि बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर वापरणे फायदेशीर ठरते.
काही सफरचंदांवर आकर्षक सुगंध किंवा कृत्रिम रंग लावलेले असतात. अशा सफरचंदांना रासायनिक प्रक्रिया झाल्याची शक्यता अधिक असते.
प्रमाणित ऑर्गेनिक सफरचंदांमध्ये रासायनिक फवारणी किंवा कृत्रिम वॅक्स नसते, त्यामुळे ते आरोग्यासाठी अधिक सुरक्षित असतात.
रसायनयुक्त सफरचंद कापल्यावर त्याचा आतील भाग लगेच काळा पडत नाही, तर नैसर्गिक सफरचंद थोड्या वेळात तपकिरी होते. ही एक ओळखण्याची सोपी पद्धत आहे.
रोज एक सफरचंद आरोग्यासाठी चांगले असते, पण ते रसायनमुक्त असल्याची खात्री करूनच खा. सेंद्रिय आणि स्थानिक उत्पादकांकडून खरेदी करा.