Konkan Tourism: ढग खाली उतरल्याचा भास, डोंगरांवर हिरवीगार चादर अन् खळाळणारे धबधबे; आंबोली घाटाचं सौंदर्य पाहून वेडे व्हाल

Sameer Amunekar

महाराष्ट्राचे चेरापूंजी

आंबोली घाटाला महाराष्ट्राचे 'चेरापूंजी' म्हटले जाते. पावसाळ्यात या ठिकाणी निसर्गाचे एक अनोखे, विलोभनीय आणि स्वर्गीय रूप पाहायला मिळते.

Sindhudurg Amboli Ghat Tourism | Dainik Gomantak

ढग आणि दाट धुके

उंच डोंगरांवरून अगदी रस्त्यापर्यंत खाली आलेले ढग आणि दाट धुके पाहून जणू आपण थेट ढगांवरूनच चालत आहोत, असा अद्भुत भास होतो.

Sindhudurg Amboli Ghat Tourism | Dainik Gomantak

निसर्गाची हिरवीगार चादर

मुसळधार पावसाच्या आगमनाने संपूर्ण आंबोली घाट आणि आजूबाजूच्या दऱ्या-डोंगर जणू काही हिरव्यागार शालूने नटून पर्यटकांचे स्वागत करतात.

Sindhudurg Amboli Ghat Tourism | Dainik Gomantak

खळाळणारे धबधबे

इथल्या प्रवासात वळणावळणावर डोंगरकड्यांवरून कोसळणारे आणि फेसाळणारे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडतात. मुख्य 'आंबोली धबधबा' तर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

Sindhudurg Amboli Ghat Tourism | Dainik Gomantak

अद्भुत जैवविविधता आणि रानफुले

घनदाट जंगलांनी वेढलेल्या या घाटात पावसाळ्यात अनेक दुर्मिळ वनस्पती, रंगीबेरंगी रानफुले, फुलपाखरे आणि बेडकांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात.

Sindhudurg Amboli Ghat Tourism | Dainik Gomantak

रोमांचक प्रेक्षणीय स्थळे

कावळेसाद पॉईंटवरून दिसणारी खोल दरी, शिरगावकर पॉईंट आणि हिरण्यकेशी नदीचे पवित्र उगमस्थान ही इथली काही प्रमुख आणि शांत ठिकाणे आहेत.

Sindhudurg Amboli Ghat Tourism | Dainik Gomantak

परफेक्ट मान्सून गेटवे

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून ब्रेक घेण्यासाठी, गरम भजी-चहाचा आस्वाद घेत निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्यासाठी आंबोली घाट हे एक उत्तम वीकेंड डेस्टिनेशन आहे.

Sindhudurg Amboli Ghat Tourism | Dainik Gomantak

बेडरूमपासून हॉलपर्यंत घर सजवायचंय? 'ही' 7 इनडोअर रोपं लावा

येथे क्लिक करा